Amol Real Test

लोकमान्य टिळक (भाषण व निबंध लेखन)



'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत व आईचे नाव पार्वतीबाई असे होते.
           लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्याचबरोबर भारतीय समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी 'केसरी' हे मराठीतून व 'मराठा' हे इंग्रजीतून अशी दोन वृत्तपत्रे प्रसिद्ध करायला सुरुवात केली. लोकमान्य टिळक यांनी या दोन वृत्तपत्राद्वारे राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले .तसेच पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. सन 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्यावेळी लोकमान्य टिळक त्यामध्ये सामील झाले.
                भारतीय समाजातील लोकांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव तसेच शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते होते. त्यामुळे जहालांचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्याकडे आले.
        सन 1908 मध्ये लोकमान्य टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळक यांनी निरनिराळे संदर्भग्रंथ मागवून 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला.
              लोकमान्य टिळक यांनी डॉ. बेझंट यांच्या सहकार्याने 'होमरूल लीग' या संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे. यालाच स्वशासन असे म्हणतात. होमरूल चळवळीमुळे राष्ट्रीय आंदोलनात नवचैतन्य निर्माण झाले. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य यांची चतुःसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला. हिंदी ही राष्ट्रभाषा असावी अशी घोषणा लोकमान्य टिळक यांनी प्रथम केली.
               लोकमान्य टिळक यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असेही म्हणतात. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे मुंबई येथे निधन झाले.
               
               

Post a Comment

0 Comments

अमोल गुरव

अमोल गुरव सातारा “चाचणी सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा“ , अमोल गुरव 8888717678 .